
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
किनवट -तालुक्यात ग्रामपंचायतीचाअंतर्गतअसलेल्या शारीरिक अपंग,दिव्यांग आणि विकलांग असलेल्या बहुतांशी जणांना शासनाचा मिळणारा तीन किंवा पाच टक्के निधी मिळत नसल्याने बहुतांश अपंग दिव्यांग व विकलांग बांधवांची अडवणूक होतआहे.परंतु या गंभीर बाबीकडे गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद लोकप्रतिनिधी कानाडोळा करीत असल्याची खंतअनेकअपंग बांधवांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.
शासनाने चौदावा वित्त आयोग, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतला जमा होणारा पाच टक्के निधी त्यापैकी समाजातील दुर्बल घटकाला म्हणून शारीरिक,अपंग दिव्यांग,विकलांगमहिला,पुरुष व बालका करिता तीन टक्के किंवा पाच टक्के त्या लाभार्थ्यांना लाभ देण्याचा शासकीयआदेशअसतानाही परंतु अशा समाजातील वंचित घटकाला तो लाभ नदेता अनेक ग्रामपंचायती अंतर्गत स्थानिक व संबंधित अधिकारी कर्मचारी लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्यानेअशा दिव्यांग,विकलांग व शारीरिक अपंग असलेल्या बांधवांवर उपासमारीची वेळ येतआहे. अपंग मंडळी जेव्हा ग्रामपंचायतच्या दालनांमध्ये जाते तेव्हा अनेक ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या तोंडून त्यांना सन्मानाची भाषा तर मिळतच नाही उलट त्यावर तुमचे पैसे आले नाहीत आम्ही काय करणार?असा सवाल केला जातो. अगोदरच निसर्गाने त्यांच्या आयुष्यात केलेला अंधार आलेले अपंगत्व यावर मात करून जगण्याकरिता अनेक जनसंघर्ष करीत असतात,परंतु शेवटीआपल्या हक्काचा पैसा मागण्यासाठी गेल्यानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांचे खडेबोल ऐकून ते हाताश होऊन माघारी फिरतात, हाताला काम नाही व कुटुंबात त्यांच्या अपंगत्व असल्याने मानसिक संतुलन व त्या बद्दलचे गैरसमज निर्माण होऊन त्यांना हेवेदाव्याची वागणूक मिळते, अशा घटकांना शासनाने त्यांना आपले जीवन जगण्यासाठी दिलेला ग्रामपंचायतस्तरावरील निधी वेळेवर मिळत नसल्याने अनेकांची व त्यांच्या कुटुंबांची कुचंबणा होताना दिसुन येते आहे.त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती लोकप्रतिनिधी गट विकास अधिकाऱ्यांनी या बाबतीत लक्ष घालून शारीरिक अपंग दिव्यांग व विकलांग बांधवांना त्यांच्या हक्काचा निधी ग्रामपंचायतस्तरावरून कसा देता येईल याकडे लक्ष देऊन विकलांग दिव्यांग व शारीरिक अपंग असलेल्या बांधवांना जगण्याचे बळ कसे देता येईल,यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.अशी मागणी अनेक नागरिकांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे. येणाऱ्या काळात हा विषय निकाली निघणे गरजेचे बनले आहे.