
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : केंद्र सरकार कसं काम करतंय हे सर्वांना माहिती आहे. चान्स मिळाला की आमचे सर्व आमदार परत येतील. पवार साहबे आणि उद्धवजी यांच्याशी बोलणं सुरू आहे. सर्व लवकरच ठीक होईल. या किंगमेकरांचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत. गुजरातमध्ये त्यांना कसं अडवलं आहे. हे सर्व आपण पाहत आहे. केंद्रातून गुजरातमध्ये कसं काम होतं हे माहिती. सात पद्धतीची सुरक्षा त्यांना दिली आहे. मुख्य रस्ते बंद केले आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याची योजना गुजरातमध्ये आखली जाते हे देशाचे दुर्दैव आहे, असे विधानही संजय राऊत यांनी केले आहे. आता राज्याचं राजकारण राऊतांच्या दाव्यानुसार पुन्हा स्थिर होणार की आणखी अस्थिर होणार हेही येणारे काही तासच सांगतील.