
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
नवी दिल्ली : अग्निपथ योजना मान्य नसेल तर सैन्यात भरती होऊ नका. सैन्यात येण्याची तुम्हाला कुणीही सक्ती केलेली नाही. सैन्यात यावं असा आग्रह कुणालाही सरकारनं केलेला नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री आणि माजी सैनाप्रमुख व्ही.के. सिंह यांनी केलं आहे. अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन कऱणाऱ्यांना त्यांनी इशारा दिला असून या योजनेला सुरु असलेला विरोध हा नाहक असल्याचं म्हटलं आहे. सैन्यदलात नोकरी करायची की नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. सरकारनं भरती प्रक्रियेची पद्धत बदलली आहे. ती मान्य नसेल तर नोकरी न करण्याचा पर्याय तरुणांसमोर आहेच. सैन्यभरती म्हणजे काही रोजगार हमी योजना नाही. ते कुठलं दुकान नाही किंवा एखादी कंपनी नाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे.