
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या मुंबईत असलेल्या आमदारांची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय. ‘गुजरात पोलिसांच्या केंद्रीय पोलिसांच्या गराड्यात त्यांना ठेवण्यात आलंय. अनेक आमदारांनी तिथून सुटण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर दहशत आणि खुनी हल्ले झाल्याची माहिती आम्हाला मिळतेय. काही आमदारांनी कळवलं आहे की आमच्या जिवाला धोका आहे. इथे आमची हत्याही होऊ शकते. अशाप्रकारचं वातावरण का तयार केलं जात आहे मला माहिती नाही. पण यातूनही शिवसेना बाहेर पडले. शिवसेनेचं संघटन यातून पुन्हा एकदा उभं राहिल. कुणी कितीही म्हणत असले तरी संघटनेला कुठेही तडा गेलेला नाही. संध्याकाळी पुन्हा बैठक आहे. अनेक आमदारांनी आमच्याशी विविध मार्गांनी संपर्क साधला’, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.