
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
ग्रुप ग्राम पंचायत मांदाटणे च्या वतीने विविध कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी जि.प. रायगडचे मा बबनजी मनवे कृषी व पशु सभापती यांच्या अध्यक्षतेखाली आजादी के स्वातंत्र महोत्सव निमित्ताने ग्रुप ग्राम पंचायत मांदाटणेचे सरपंच मा चंद्रकांत पवार आणि त्याच्या सर्व सदस्य यांनी विविध प्रकारचे उपक्रम राबवून परसबाग निमिर्ती वाढवण्यासाठी शेतकऱ्याना चांगल्या दर्जाचे बियाणे वाटप करण्यात आले, वृक्ष लागवड करण्यात आली, शाळेतील मुलांना दाखले वाटप करण्यात आले नागरिकांना शासनाच्या विविध योजना यांची माहिती व लोकांना रोजगार निर्मिती पेन्शन योजना इ श्रम कार्ड, किसान कार्ड ,शेतीचे महत्व पटवून लोकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी मान्यवर म्हसळा तहसिलदार मा श्री. समीर घारे साहेब, विस्तार अधिकारी सुनील गायकवाड साहेब ,कृषी अधिकारी मंगेश साळे साहेब यांची उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले ,महिला बचत गट मार्गदर्शक परकाळे साहेब ,कृषी सहायक शिंदे, बाकर साहेब ,खामगाव सजा सर्कल सलीम शा, मुख्यध्यापक माळी सर ,सोनावणे सर, माजी सरपंच राजाराम धुमाळ,तंटामुक्त अद्यक्ष अनंत पवार उपसरपंच शंकर गोरीवले,ग्रामसेवक पी बी ठाकरे,जगजीवान लाड ,प्रकाश लाड,प्रदीप पवार,उत्तम शिंदे,संतोष लाड,विनय साळवी या कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे आभार श्री सोनावणे सर यांनी मान्यवरांचे आभार मानले