
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
(देगलूर प्रतिनिधी ) दिनांक 21/06/2022 रोजी गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दमन देगांवकर उपस्थित होते. सचिन जाधव यांनी योग दिनाविषयी माहिती सांगितली . जेष्ठ शिक्षिका सौ.स्मिता कुलकर्णी यांनी योगदिनानिमित् विद्यार्थ्यांचे योग प्रात्याक्षिक घेतले.यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.