
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- किशोर वाकोडे
मलकापूर: दि.२२ स्थानिक पद्मश्री डॉ वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूर येथील
संगणक अभियांत्रिकी शाखेतील एम. ई. मधील वैभव प्रकाश दांडगे या विद्यार्थ्यांस वन नेटवर्क एंटरप्रायझेस, पुणे या आंतरराष्ट्रीय कंपनीत २७ लाखाचे पॅकेज मिळाले. या कंपनीनत वैभव ची सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड करण्यात आली. त्याला मिळालेल्या या भरगोस यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल खर्चे यांनी वैभव चा शॉल, श्रीफळ व पुष्पगुछ सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी संगणक शाखेचे विभाग प्रमुख प्रा. सुदेश फरफट, प्रा. गिरीश पाटील, प्राध्यापिका मंजिरी करांडे उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयाचे चेअरमन श्री. डी. एन. पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते, श्री. सुधीर पाचपांडे, श्री. देवेंद्र पाटील, श्री. अनिल इंगळे यांनी वैभव चे अभिनंदन करीत त्याला त्याच्या भावी उज्जल आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तांत्रिक शिक्षणामुळे व्यावसायिक शिक्षणाची ओळख होते. श्रमिकांचे श्रमाचे महत्त्व, कामाचे
मोल होणारा परिणाम त्यानुसार त्यांचा असणारा सामाजिक दर्जा यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये
निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालयात वेळोवेळी व्यावसायिक मार्गदर्शनावर तज्ञांमार्फत कार्यशाळा आयोजित केल्या जातात. सोबतच दरवर्षी कोलते महाविद्यालयात जागतिक
पातळीवर सर्व क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या नामांकित कंपनीचे कॅम्पस वेळोवेळी आयोजित
करण्यात येतात. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणावरच अवलंबून असतो. तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो तितका यशाच्या शिखरावर जाऊन बसतो. शिक्षणाची दिशा
माणसाच्या संपूर्ण विकासासाठी व मूलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते. देशाला आर्थिक
महासत्ता व प्रभावी राष्ट्र बनविण्यास युवक महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. त्यामुळेच विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकास करणाऱ्या तांत्रिक अभियांत्रिकी शिक्षणाची आता देशाला गरज आहे. याबाबतचे वक्तव्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल खर्चे यांनी केले आहे.