
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
मुंबई. एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेसांठी संघर्षाच्या काळ सुरु असताना ठाकरेनं समोर संकट काही केल्या संपत नाहीये राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांना सकाळी कोरोनाची लागण झाल्यांचे वृत्त समोर आले असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्यांची माहिती काँग्रेस प्रदेशांध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली. उद्धव ठाकरे यांना जरी कोरोनांची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती ठीक आहे काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याशी त्यांचे बोलणे झाले आहे अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. आज दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्हिडीओ मीडियांच्या माध्यमांतून ते बैठकीत सहभागी होतील. विधान सभा बरखास्तीचा कोणताही विचार नाही पूर्ण ताकतीने सरकार चालवणार असे मुख्यमंत्री यांनी आम्हांला सांगितले आहे अशी माहिती नाना पटोले यांनी सोशल मीडियावरुन दिली. महाराष्ट्रांचे राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांना कोरोनांची लागण झाल्याचे समोर आलं असून राज्यपालांना रिलायन्स रुग्णालयांत दाखल करण्यांत आले . गेले दोन-तीन दिवसापासून राज्यपाल यांना ताप येत होता त्यांना पुढील उपचारासांठी रुग्णालयात दाखल करण्यांत आले असल्यांची माहिती काँग्रेस प्रदेशांध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.