
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा न्यायालयात उत्साहात जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला. योग शिकवण्यासाठी पतंजलीचे प्रशिक्षक दिपक भातलोंडे यांनी सकाळी 6 वाजता लोहा न्यायालयाच्या परिसरात आयुष्य मंत्रालयाच्या नियमाने योगा शिकवला. या कार्यक्रमात लोहा न्यायालयाचे प्रमुख न्या.ए.व्ही.डाकोरे, दुसरे सह.न्या.एस.एल.वैद्य उपस्थित होते.
तसेच लोहा अभियोक्ता संघाचे अध्यक्ष अॅड.मोटरवार व उपाध्यक्ष अॅड.मच्छेवार, अॅड.बाबर, अॅड.गोरे, अॅड.गायकवाड, अॅड.क्षिरसागर व मुनशी भावे, न्यायालयीन कर्मचारी वसंत वडजे, आडे, चंपती शिंदे, सोनकांबळे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी उपाध्यक्ष अॅड.व्ही.टी.मच्छेवार व वसंत वडजे यांनी अधिक परिश्रम घेतले. प्रशिक्षक दिपक भातलोंडे यांचा लोहा न्यायालयाचे न्या.ए.व्ही.डाकोरे यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.