
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा : – पार्डी येथील सह्याद्री गृप ऑफ इंस्टिट्यूशन्स च्या शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिवस अतिशय उत्साहात ,आनंदात साजरा करण्यात आला .या दिनाच्या कार्यक्रम च्या अनुषंगाने योगाचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे ,योगामुळे आपले जीवन निरोगी कसे बनते हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले .
आजच्या या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाला शाळेचे संचालक आदरणीय श्री सुदर्शन शिंदे सर ,शाळेच्या संचालिका आदरणीय सौ जयश्री ताई शिंदे मॅडम ,त्यासोबतच आजच्या आपल्या कार्यक्रमाला योगगुरू म्हणून लाभलेल्या लोहा येथील डॉक्टर सौ सविता घंटे मॅडम ,शाळेचे प्राचार्य श्री नागेश हिरास सर, सीबीएसई चे मुख्याध्यापक श्री नंदकिशोर मेकाले सर ,उपमुख्याध्यापिका सौ सुप्रिया वाडेवाले मॅडम ,पर्यवेक्षक श्री पांचाळ काशिनाथ सर, इतर सर्व सर्व शिक्षक व विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली .
आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य देवता माता सरस्वती यांच्या मूर्ती पूजनाने झाली . प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले . त्यानंतर आजच्या आमच्या योगगुरु डॉक्टर सौ सविता घंटे मॅडम यांनी अतिशय सुंदर, मार्मिक शब्दात मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना योगाची माहिती दिली .त्यासोबतच योगासनाचे विविध प्रकार, योगासनाचे फायदे ,योगामुळे आपले जीवन कसे निरोगी बनते, आजार कसा दूर जातो या सर्व बाबींची माहिती प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून मुलांना करून दिली .या कार्यक्रमात मुलांनी हसत खेळत तब्बल दीड तास योगा केला .
आजच्या या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालनाची जबाबदारी श्री दत्तात्रय जाधव सर यांनी पार पाडली .तर कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्याची जबाबदारी सौ अनुपमा कोलते मॅडम यांनी पूर्ण केली .
अशाप्रकारे सह्याद्री ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स च्या शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन अतिशय आनंदात पार पडला .