
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
भैरवनाथ अष्टमी समिती शेटफळ हवेली यांच्या वतीने भैरवनाथ अष्टमी सोहळ्या निमित्त चांडाळ चौकडीच्या करामती यामधील बाळासाहेब नावाने सर्व परिचित असणारे ह.भ.प. भरत शिंदे महाराज यांचे समाज प्रबोधनपर सुश्राव्य किर्तन मंगळवार दि. २१/०६/२०२२ रोजी सायंकाळी ८.०० वा. भैरवनाथ मंदिर शेटफळ हवेली येथे संपन्न झाले.
यावेळी शेटफळ हवेली व पंचक्रोशीतील हजारो लोकांनी हजेरी लावली होती.यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. किर्तन सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.हि किर्तन सेवा आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक मंडळ शेटफळ हवेली यांच्या वतीने करण्यात आली होती, तर महाप्रसादाचे आयोजन श्री.मोहन रामचंद्र पवार व श्री. प्रताप नामदेव नवले यांच्या वतीने करण्यात आले होते.लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय अमित पांडुरंग निंबाळकर यांच्या वतीने करण्यात आली होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भैरवनाथ अष्टमी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.