
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर – शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद येथे शिकणाऱ्या रेखा एकनाथ ढगे ह्या विद्यार्थिनीला शिक्षणासाठी जिल्हाधिकरी सुनील चव्हाण यांच्याकडून लॅपटॉप भेट देण्यात आला आहे.
जळगाव घाट तालुका कन्नड येथील रेखा एकनाथ ढगे यांना जन्मताच दिव्यांग आहे मात्र यावर मात करत जळगाव सारख्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी ती औरंगाबाद येथे आली. सध्या शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात ती बी. ए. तृतीय वर्षात शिक्षण घेत असून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे ती सद्या मातोश्री शासकीय ज्ञान विज्ञान मुलींच्या वसतिगृहात राहते. हे वसतिगृह जिल्हाधिकारी चव्हाण याच्या शासकीय निवासस्थानाच्या बाजूलाच असल्यामुळे येथील समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी चव्हाण सकाळी सकाळीच मॉर्निंग वॉक करत वस्तीगृहात पोहोचले यावेळी रेखा ढगे ही विद्यार्थिनी अभ्यास करताना दिसली जिल्हाधिकरी सुनील चव्हाण यांनी आपुलकीने तिला तिची समस्या विचारली तर रेखाने पुढील शिक्षणासाठी लॅपटॉप मिळाला तर मोठी मदत होईल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडली यावर जिल्हाधिकारी यांनी कार्यतत्परता दाखवत तुला दोन दिवसात लॅपटॉप देतो असा शब्द देऊन तिला प्रोत्साहित केले आणि सोमवारी दिनांक २० जून रोजी लॅपटॉप भेट देऊन तुला भविष्यात कुठलीही अडचण असेल तर मला संपर्क कर मी तुला मदत करेल असा शब्द दिला.
प्रतिक्रिया
जिल्हाधिकारी चव्हाण साहेबांच्या कार्यतत्परतेचा अभिमान वाटतो. यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे माझा आत्मविश्वास वाढला असून जबाबदारी देखील वाढली आहे येणाऱ्या काळात जास्तीत जास्त अभ्यास करून यश संपादन करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
रेखा एकनाथ ढगे