
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- भरत पवार
आंबेडकर नॅशनल कॉंग्रेस पार्टीने गटविकास अधिका-यांकडे केली मागणी
लोहा तालुक्यामध्ये डा.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेच्या ब-याच मागासवर्गिय लाभार्थ्यांना नविन विहीर मंजुर झाल्या आहेत त्यापैकी मौ.खडकमांजरी येथील विहीरीचे लाभार्थी सौ.शोभाबाई पंढरी वाघमारे यांनी विहीरीचे खोदकाम केले व विहीरीचे बांधकाम केले आहे तर यांचे बिल काढण्यासाठी लोहा पंचायत समितीचे कृषी अधिकारी भारती यांनी एक महीण्यापासुन रु.१५००० घेउन अद्याप बिल काढले नाही व आजुन बिल काढण्यासाठी र.१०००० हजाराची कृषी अधिकारी भारती यांनी मागणी केल्याचे निवेदन गटविकास अधिकारी लोहा यांना दिले आहे.
तर याच गावातील नविन विहीर मंजुर झालेले दुसरे लाभार्थी वंदना गंगाधर खराटे आणी सुशिलाबाई मोहन एडके यांना डा.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमधुन मंजुर झालेल्या विहीरी मंजुर करुण देण्यासाठी व बिले काढुन देण्यासाठी कृषी अधिकारी भारती यांनी या दोन्ही लाभार्थ्यांकडुन पृत्येकी रु.२५००० हजार रुपये घेतले आसल्याचे गटविकास अधिकारी लोहा यांना आज आंबेडकर नॅशनल कॉंग्रेस पार्टीचे पृदेश उपाध्यक्ष अनिलदादा गायकवाड व सामाजीक कार्यकर्ते विठ्ठल सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देउन दि.२८/६/२०२२ रोजी लोहा पंचायत समिती कार्यालयावर आकरोष मोर्चा काढण्याचा ईशारा देण्यात आला आहे.