
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:देगलूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील ३० ते ४० टक्के नागरिकांना एपीएल, बीपीएल, अंत्योदय कार्डधारक असून, त्यांना आज तागायत कोणत्याही प्रकारचे राशन कार्ड वाटप करण्यात आले नाहीत. त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजना योजनेचा लाभ मिळत नसल्याने राशनकार्ड वाटप करण्यासाठी तालुक्यातील तहसील कार्यालयात कॅम्प राबवण्याची मागणी, उपजिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांच्याकडे मनसे तालुका अध्यक्ष श्रीकांत काळे यांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सर्व सामान्य नागरिकांना तहसील कार्यालयात कार्ड स्टॉक नाहीत, ऑनलाईन साईड चालू नाही, कागदपत्राच्या जाचक अटी अशा विविध कारणांमुळे नागरिकांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. राशनकार्ड धारकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत असतो. मात्र काही नागरिकांकडे राशनकार्ड नसल्याने शासनाच्या योजनेपासून वंचित रहात आहे. मुखेड – देगलूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये राशन कार्ड नसल्याने धान्य ही मिळत नाही. आजारी व्यक्तीस शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना, पंतप्रधान आरोग्य योजना अशा विविध योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे मुखेड देगलूर तालुक्यात तहसील कार्यालयात लाभार्थ्यांना राशन कार्ड वाटप करण्यात यावे अशी मागणी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मनसेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत काळे यांनी केली आहे.