
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षा निमित्त प्रशासकीय काम सुलभ व सोपे व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराजस्व अभियान व विविध शासकीय योजना राबविण्यात येत आहे.महसूल च्या या लोकाभिमुख उपक्रमाचा शेतकरी , नागरिकांनी फायदा घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर यांनी केले.
भिवधानोरा (ता.गंगापूर) येथे बुधवारी (ता.22)रोजी सकाळी दहाच्या सुमारास महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत विविध शासकीय योजनांची माहिती देतांना उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर हे शेतकरी ,नागरिकांशी संवाद साधतांना बोलत होते.
यावेळी त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना संगणिकृत सात बारा वाटप करण्यात आले.ई पीक पाहणी प्रात्यक्षिक करून दाखवली.42 ड बाबत जनजागृती करून गावठाण पासून 200 मीटर अंतरावर असलेली शेतजमीन महसूल ची फिस भरून अकृषिक करता येते.तुकडा बंदी,कुलकायदा आदी महसूल च्या सुधारणा झालेल्या नवीन कायदे,निर्णया विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.
यावेळी शेतकरी नागरिकांनी पुनवर्सन गावाला गावठाण विस्तार पाहिजे, शेती विषयी समस्या,वीज,रस्ते,शिक्षण,आरोग्य आदी मूलभूत नागरी सेवा सुविधांच्या अडीअडचणीचा पाडाच वाचला.
यावेळी उपविभागीय अधिकारी श्री आहेर व तहसीलदार सतीश सोनी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी मंडळ अधिकारी बालाजी सोनटक्के ,भिवधानोरा येथील तलाठी दत्तात्रय शिंदे,भेंडाल्याचे तलाठी श्रीराम जोशी,कायगाव चे तलाठी सतीश क्षीरसागर, पखोरा येथील तलाठी कृष्णा प्रेमभरे, भिवधानोरा येथील उपसरपंच बाबासाहेब चव्हाण, रामेश्वर चव्हाण,प्रहार शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब शेळके,अगरवाडगाव येथील उपसरपंच अशोक म्हसरूप,डॉ. भगवान सटाले,पोलीस पाटील शिवाजी तांगडे,कृष्णा नवथर,कल्याण गायकवाड,काकासाहेब म्हसरूप, राजीव जैस्वाल,लतीफ शेख,सचिन तुपे,काशीनाथ धरपले,रमेश चव्हाण आदी शेतकरी ,नागरिक उपस्थित होते