
दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी-पंकज रामटेके
दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी सफेद झंडा कामगार संघटना च्या माध्यमातून ACC कंपनी च्या विरोधात अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव व ACC कामगारांच्या माध्यमातून काम बंद आंदोलन करण्यात आले होते या कामबंद आंदोलन करण्याचे कारण ACC कंपनीतील न्यु पॅकिंग हाऊस प्लॉंट येथील कामगारांचा गेल्या दहा वर्षांपासून नितीन शर्मा ठेकेदारांनी PF कटोती करून कामगारांच्या PF खात्यात तिन महिन्याचा कधी दोन महिन्याचा PF जमा करायचा
2014 मध्ये कामगारांनी मिळुन तेथील युनियन व PF कमिशनर नागपूर यांना यांना सुद्धा कळविण्यात आले होते तरी सुध्दा चोरी झालेला PF भरणा केलेला नाही व कसलीही चौकशी सुरू केलेली नाही
व तसेच 2016 पासुन मेंटेनंन्स डिपार्टमेंट येथील कामगारांचा अद्याप PF देखील भरलेला नाही ह्या सर्व कामगारांना घेऊन दि. 5 जुन 2021 रोजी घुग्घुस येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव व ACC कामगारांना घेऊन घुग्घुस आठवडी बाजारात रंगमंच येथे उभारण्यात आले होते हे आंदोलना मध्ये काम सुरू करुन आंदोलन करण्यात आले होते तरीही ए. सी. सी कंपनीतील मॅनेजमेंट ने त्या आंदोलन करी कामगारांना कामावरून निलंबित केले होते. आंदोलनाचा चौदा दिवस ओलांडला चौदाव्या दिवस पोलीस स्टेशन घुग्घुस पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे साहेब यांच्या समक्ष ACC कंपनीचे व्यवस्थापक यांनी चोरी झालेला PF व मागण्यासाठी 31 जुलै 2021 रोजी म्हणजे एक महिण्र्यंयाचा आत आम्ही चोरी झालेला PF चा भरणा करणार व अन्य मागण्या पूर्ण करुन देऊ आणि ज्या कामगारांना निलंबित करण्यात आले होते त्यांना कामावर परत रुजू करू असे घुग्घुस ठाणेदारा समोर लेखी आश्वासन ACC कंपनी तर्फे देण्यात आले होते परंतु एक दोन महिने व सतत सात ते आठ महिने ओलांडून सुध्दा चोरी झालेला PF अद्याप बरोबर भरला गेला नव्हता व ज्या ठेकेदाराकडे कामगार काम करत होते त्या ठेकेदारावर ACC कंपनीने कसलीही कारवाई न करत त्या ठेकेदारासोबत साठ गाठ करून त्याला पडुन लावण्यास कंपनीनेचे मॅनेजमेंट नी मदत केली तो ठेकेदार काम सोडून पळून गेला व ACC कंपनीने दुसर्या ठेकेदाराला म्हणजे दत्ता ठेकेदाराला ते काम देण्यात आले त्या ठेकेदारांनी सुध्दा सुरुवातीला कामगारांचा पगार देखील बरोबर वेळेवर न करता त्या पगारासाठी सुध्दा कामगारांना आंदोलन करावे लागले तेव्हा त्या ठेकेदारांनी कामगारांचा पगार दिला कामगारांचा लक्षात आले की ज्या नवीन ठेकेदाराकडे आपल्याला बदलविण्यात आले आणि त्या कामगारांची जॉयनींग देखील नवीन दाखवत आहे. तर कामगारांना मध्ये रोष निर्माण झाला आपण या कंपनीत गेल्या दहा वर्षांपासून काम करत आलो आहोत आणि आज या कंपनीने आपल्याला नवीन जॉइनींग दाखवून आणखी आपल्याला कुठे बाहेर लोन किंवा अन्य सुविधा मिळणार नाही. याचे सुध्दा भान कामगारांना देखील दिसुन आला
ACC कामगारांनी स्वतःची युनियन स्थापना करुण सफेद झंडा कामगार संघटना या संघटनेचा माध्यमातून ACC कंपनीला मागणी केली की चोरी केलेला PF हा कामगारांच्या खात्यात जमा करा व ठेकेदारी पद्धत बंद करा दहा ते वीस वर्षापासून जो कामगार काम करीत आहेत अशा कामगारांना नियमित करा जने करून ठेकेदारी कामगारांचा PF चोरी ठेकेदार करणार नाही व अन्य कंपनीचा सुविधांन पासुन वंचित राहणार नाही म्हणून दिनांक 27 जानेवारी 2022 पासून ACC येथील सर्व कामगारांचे वेतन, मेडिकल, बोनस, 26 डय़ुटी, वर्षाचे 8 PL, CL, SICK, सर्व कामगारांचा पाल्यांना शिक्षणात 50% सुट व अन्य मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन ACC कंपनीचा विरोधात करण्यात आले होते जो पर्यंत मागण्या होणार नाही चोरी केलेला PF भरणार नाही तोपर्यंत कामगारांचा काम बंद आंदोलन सुरू राहील पण ए. सी. सी चांदा सीमेंट कंपनीच्या मॅनेजमेंटनी षडयंत्र रचुन आंदोलन फोडून कळण्यासाठी प्रयत्न सुरू केला त्या आंदोलना मध्ये कामगाराला धमकावले जात होते जर का तुम्ही त्या आंदोलना मध्ये सहभागी झाले तर तुम्हाला कामावरून बंद करण्यात येईल असा अनेक प्रकारच्या धमक्या कंपनी तर्फे देण्यात आल्या 28 जानेवारी 2022 रोजी तर हद पार केली आंदोलन फोडून कळण्यासाठी कंपनीने काही गुंड बाहेरून बोलावून आंदोलनामध्ये मार पिट तोड फोड सुध्दा करण्यात आली जेव्हा कि हे आंदोलन शांती पुर्वक सुरू होते असा अनेक प्रकारच्या कंपनी तर्फे होणाऱ्या शोषण व अत्याचाराविरुद्ध कामगारांना तोड द्यावे लागत होते तरी सुद्धा ठाम पणे कामगार व सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी 37 दिवस सुरू होते ह्या आंदोलनाची दखल घेत ACC कंपनीने कामगारांची 15 लाखाचा मेडिकल इंश्योरेंस, कामावरून ये-जा करतांना जर कामगारांचा काही अपघात झाल्यास 3 लाखाचे इंश्योरेंस देऊ, व चोरी झालेला PF चे 1 करोड 5 लाख रुपये कंपनीने भरले 2 वर्षापासून L.T. देण्यात आली नव्हती ते 2 वर्षाचे P. L. . म्हणजे एका कामगारांना 25 ते 30 हजार रुपये सुध्दा या कंपनीला द्यावे लागले जो आज पर्यंत दिला नव्हता या आंदोलना मध्ये कामगारांच्या अनेक मागण्या सुध्दा या ACC कंपनीने मान्य करण्यास कामगाराने भाग पाडले.
परंतु ज्या कामगारांनी कंपनीच्या चोरी झालेला PF साठी आवाज उचलले आज त्या कामगारांना ACC कंपनी कडून होत असलेले अत्याचार सहण करावे लागत आहे त्या कामगारांना कामावर बंद करण्यात आले जर का होत असलेल्या कंपनीचा अन्यायाविरुद्ध आवाज उचलणे जर चुकीचे असेल तर कामगारांना कामावरून बंद करण्यात यावे असे कामगारांनी मत व्यक्त केले
आणि या आंदोलना मध्ये ठेकेदार यांच्या कडून कामगारांना निलंबित लेटर देऊन कामगार यांना कामावरून बंद करण्यात आले आणि 4 मार्च 2022 रोजी लेबर कमिशनर चंद्रपूर येथे मीटिंग आयोजित करण्यात आली या मिटींग मध्ये ए. सी. सी चांदा सीमेंट कंपनी चे मॅनेजमेंट यांनी असे आश्वासन दिले कि पहीले तुम्ही सुरू असलेले ते आंदोलन बंद करून उचला मी 12 मार्च 2022 रोजी पर्यंत सर्व कामगारांना कामावर रुजू करणार असे मॅनेजमेंट पुष्कर चौधरी यांनी सांगितले पण आता सतत या आश्वासनाला तिन महिने पूर्ण होऊन सुद्धा काही कामगारांना कामावर रुजू केले आणि ज्या ज्या कामगारांनी पुढे येऊन होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उचललेला आहे त्या कामगारांना कामावर रुजू करण्यासाठी कंपनी मागे पुढे बघत आहे
जर कंपनीने PF चोरीवर आधीच आळा घातला असता तर आज ही वेळ आली नसती.
कामगार कंपनी व ठेकेदारानी करत असलेले अत्याचार ठेकेदार यांनी असे सांगितले की तुम्ही सकाळी 8.30 व सायंकाळ 5.30 रोज सही करण्यासाठी या तुम्हाला अर्धा पगार देऊ पण आता सही सुध्दा करणे ठेकेदारान बंद केले ज्या ठेकेदाराने 10 वर्षा पासुन PF चोरी केला त्या ठेकेदारावर कंपनीने कसलेही कारवाई केली नाही जे कामगार आपल्या हक्कासाठी आंदोलन केले त्या कामगारांला कामावरून काढून टाकण्यात आले हे कसला न्याय आहे
कंपनी हे कामगारांवर षडयंत्र रचुन या कामगारांना कामावर काळण्याचा जर प्रयत्न करित असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही 72 तासाच्या आत लवकरात लवकर कामगारांना कामावर रुजू करण्यात आले नाही तर 72 तासानंतर ए. सी. सी कंपनी चे गेट जाम करून कुणालाही कामावर जाऊ देणार नाही जोपर्यंत ज्या कामगारांना कामावर रुजू करणार नाही तोपर्यंत गेट बंद आंदोलन करण्यात येईल या आंदोलना मध्ये जे काही नुकसान भरपाईचे जिम्मेदार हे स्वतः ए. सी. सी चांदा सीमेंट कंपनी व संबंधित अधिकारी शासन प्रशासनाची जबाबदारी राहील
यावेळेस उपस्थित राजेंद्रभाऊ वैद्य जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर , सुनीलभाऊ दहेगावकर प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रज्ञाताई पाटील युवती जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर, सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव जिल्हा महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर सुहास बहादे जिल्हाध्यक्ष जेष्ट नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, घुग्घुस शहर अध्यक्ष दिलीप पिट्टलवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घुग्घुस कुणाल ढेंगळे जिल्हा महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी उपाध्यक्ष घुग्घुस शहर अशोक आसमपल्लिवार, महासचिव शरद पाईकराव दत्ता वाघमारे महेश शर्मा व समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी उपस्थित होते