
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे दि.२२: ससून रुग्णालयातील आयुर्वेद विभागात ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी रुग्णांना योगाची प्रात्यक्षिके दाखवून योगाभ्यासात सहभागी करुन घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष विभागाचे सहायक संचालक तथा ससून आयुर्वेद रुग्णालयाचे आयुर्वेद विभाग प्रमुख वैद्य व्यंकट धर्माधिकारी होते. अष्टांग आयुर्वेद रुग्णालयाचे उपअधीक्षक वैद्य मिलिंद भडके हे यावेळी उपस्थित होते.
योग हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे वैद्य धर्माधिकारी यांनी सांगितले. तसेच वैद्य भडके यांनी व्याधी व योग याचा संबंध तसेच व्याधींनुसार योग याचे विस्तृत मार्गदर्शन केले.
यावेळी ससून रुग्णालयातील आयुर्वेद विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.