
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे, दि. २२: जागतिक बाल कामगारविरोधी दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि बाल न्याय मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील बाल निरिक्षण गृहामध्ये कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगल कश्यप, बाल न्याय मंडळच्या पीठासीन अधिकारी मानसी परदेशी, डॉ. एल. एन. दानावडे, के. टी. थोरात, जी. एन. पडघन, के. एस. कोल्हटकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती कश्यप यांनी विधी संघर्षग्रस्त बालक व त्यांच्या पालकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. श्रीमती परदेशी यांनी बाल न्याय मंडळाची कार्यवाही, श्री. दानावडे यांनी बाल कामगार विरोधी दिन तसेच अन्न सुरक्षा कायदा, श्रीमती कोल्हटकर यांनी मोफत आणि सक्तीचे शिक्षण कायदा या विषयावर माहिती दिली. कार्यक्रमामध्ये पुणे निरिक्षण गृहामधील बालकांनी सहभाग घेतला.