
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : एकीकडे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर संकटाचे ढग दाटले आहेत. ठाकरे सरकार कधीही पडू शकते. दुसरीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
काँग्रेस नेते कमलनाथ आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. कमलनाथ म्हणाले की, मला उद्धव ठाकरेंना भेटायचे होते, पण ते कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे आमची भेट होऊ शकली नाही. ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये पूर्ण एकजूट आहे. आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत. आमच्या बैठकीला 41 आमदार उपस्थित होते तर तीन आमदार वाटेत आहेत.
उद्धव ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आज दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत ते ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत.