
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली – दिवाण हौसिंग फायनान्स लि. या कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान आणि संचालक धीरज वाधवान यांच्या विरोधात 34 हजार 615 कोटी रूपयांच्या बॅंक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने आज नव्याने गुन्हा दाखल केला आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सीबीआयच्या 50 अधिकाऱ्यांच्या पथकाने वाधवान यांच्या मुंबई आणि अन्य परिसरातील 12 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. या गैरव्यवहार प्रकरणात सुधाकर शेट्टी आणि अन्य आठ जणांवरही गुन्हे दाखल असल्याने त्यांच्याही ठिकाणांवर छापे टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.
दिवाण हौसिंग फायनान्स कंपनीने बॅंकांकडून 2010 ते 2018 या काळात तब्बल 42 हजार 817 कोटी रूपयांची बॅंक क्रेडीट सुविधा मिळवली होती. परंतु मे 2019 नंतर त्यांनी बॅंकांची ही रक्कम थकवण्यास सुरूवात केली. त्यांनी तब्बल 34 हजार 615 कोटी रूपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार आहे. दिवाण हौसिंग फायनान्स ही कंपनी आता पुर्ण गाळात गेली आहे. वधवान बंधुंनी या प्रकरणात खोट्या नोंदी दाखवल्या असून मोठ्या रकमा अन्यत्र वळवल्या आहेत असे ऑडिट मध्ये आढळून आले आहे.