
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
कोल्हापूर: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांना अध्यक्षपदावर हटवण्यात आले.
दरम्यान आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीकडे मेघराज राजेभोसले हे गैरहजर होते. मेघराज राजे भोसले यांच्या कार्यपद्धतीवर अनेक संचालकांनी आक्षेप नोंदवला होता गेले वीस महिने त्यांनी कार्यकारिणीची बैठक बोलावली नव्हती. सध्याच्या कार्यकारिणीची मुदत संपून वर्षभराचा कालावधी उलटला होता. कार्यकारिणीची मीटिंग न झाल्यामुळे कोणतेही निर्णय होत नव्हते. महामंडळाच्या अनेक संचालक आणि प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांच्या निदर्शनास ही बाब आणली. त्यानंतर कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली.
कोल्हापूर येथील हॉटेल के ट्री येथे संचालक यांची मिटिंग झाली. महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत महामंडळाच्या कार्यकारिणीने 26 नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर केला होता. त्या सभेचे इतिवृत्तांत आजच्या बैठकीत मंजूर करावा असा विषय मांडण्यात हा विषय कार्यकारणी मध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला.