
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सध्या कोविड व लंग इन्फेक्शन आजाराने त्रस्त आहेत. आपली प्रकृती पुर्ण बरी होई पर्यंत आपल्या संबंधातील चौकशीचे काम पुढे ढकलावे अशी विनंती त्यांनी ईडीला केली आहे.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात राहुल गांधी यांच्या समवेतच त्यांच्याही चौकशीचे समन्स ईडीने जारी केले आहेत.
यातील राहुल गांधी यांच्या चौकशीचा भाग पुर्ण झाला आहे. तथापि सोनियांची चौकशी बाकी आहे. आपली प्रकृती पुर्ण बरी होईपर्यंत काहीं आठवडे तरी ही चौकशी पुढे ढकलली जावी असे सोनिया गांधी यांनी ईडीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
श्रीमती गांधी आजारपणामुळे रूग्णालयात दाखल होंत्या. सोमवारीच त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. केवळ राजकीय सूडबुद्धीने सरकारने सोनिया व राहुल गांधी यांच्या मागे ईडी चौकशीचा ससेमीरा लावला आहे असा आरोप कॉंग्रेसने या आधीच केला आहे