
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मात्र मी बाजुला झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहिजे !
मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे बंडखोरी केल्यानंतर आपल्यासोबत 46 आमदार असल्याचा दावा केला आहे. शिवाय आमदारांसोबतचा फोटोही शेअर केला होता. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा नेमका आकडा समोर आला आहे.
त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करून जनतेशी संवाद साधला.
राज्यातील राजकीय उलथापालथ सुरू असताना उद्धव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपण राजीनामा देण्यास तयार असून कोणत्याही शिवसेना आमदाराने माझ्याकडे यावं. त्यांनी मला सांगावं तुम्ही राजीनामा द्या. मी कागदावर सही करून ठेवतो. तो कागद तुम्हीच राजभवनला जावून द्या. मात्र येथे समोर या, मी पद सोडायला तयार असल्याचं उद्धव यांनी सांगितलं.
ते पुढं म्हणाले की, अविश्वास ठराव मला नकोय. मला कोणत्याही आमदाराने येऊन सांगवं की, मुख्यमंत्रीपदी नकोय. त्या आमदाराचं नावही घेणार नाही, अस आवाहन उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान आपल्याला मुख्यमंत्रीपद नकोय. माझ्या मुख्यमंत्रीपदासाठी एका आमदाराने विरोध केला तरी मी पद स्वीकारणार नाही. मात्र मी बाजुला झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहिजे यावर आपण ठाम असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.