
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे बंडखोरी केल्यानंतर आपल्यासोबत 46 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळ महाराष्ट्राच राजकारण ढवळून निघालं आहे. यावर आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या शिवसैनिकांना असं वाटत असेल की मी शिवसेनेचं नेतृत्व करायला नकोय, त्यांनी मला सांगावं. मी शिवसेना प्रमुख पद सोडायला तयार आहे, पण हे मला समोरासमोर सांगा. संकटाला सामोरं जाणारा शिवसैनिक आहे. म्हणून शिवसैनिकांनी मला सांगावं मी दोन्ही पदं सोडायला तयार आहे. पण मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असेल तरच, असंही उद्धव यांनी स्पष्ट केलं.
तुम्ही म्हणालात शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको. दुसरा कोणीही चालेल. चला तेही मला मान्य आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा. आमचं तुमच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. म्हणून एकदा ठरवूया. तुम्ही या किंवा तिकडनं सांगा, अस आवाहनही उद्धव यांनी केलं.