
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
सेव्हनहील पुलाजवळ कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी भीमराव फलटणकर यांनी आज संध्याकाळी ६ वाजेदरम्यान एका दुचाकीला थांबवून गाडीच्या कागदपत्राविषयी विचारणा केली. तेव्हा कागदपत्रे न दाखविता दोन युवकांनी त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. आणि खिशातील चाकु काढत पोलिस कर्मचारी भीमराव याना मारण्याचा प्रयत्न करत गाडी घेऊन पळून गेले.
त्यानंतर भीमराव यांनी तात्काळ जिन्सी पोलीसांना याची माहिती दिली.
यानंतर जिन्सी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनंता तांगडे आणि सहकार्यांनी शोध घेत दोन्ही आरोपींना अपेक्स हॉस्पिटल परिसरातुन अटक केली. मोहम्मद सिद्दीकी खालेद चाऊस (वय.32) आणि सय्यद सलमान आणि सय्यद सऊद (वय.22) असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींचे नाव आहे. त्यांनी सदरील गुह्याची कबूली दिली असून त्यांच्याकडून चाक़ू आणि शाईन गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. त्यांच्याविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कारवाई पोलीस निरीक्षक विनोद सलगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंता तांगडे, हेड कॉन्स्टेबल जफर शेख, सुनील जाधव, नंदलाल चव्हाण, नन्दूसिंग परदेशी, वाशिद पटेल, संतोष शंकपाळ यांनी यशस्वी पार पाडली.