
दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
पिंपरी:झेप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वारक-यांना फराळाचे,व फळांचे वाटप करण्यात आले.
झेप फाऊंडेशन चे संस्थापक/अध्यक्ष कांता (भाऊ) राठोड व त्याचे पदाधिकाऱ्यांनी आज पुण्यामध्ये वारक-यांना फराळाचे व फळांच्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी फाउंडेशनचे संस्थापक/ अध्यक्ष कांता ( भाऊ )राठोड व संस्थापक /सचिव शिवाजी मुसळे व सहकारी रमेश राठोड, विलास अंधारे ,शहाजी मुसळे, वकील राजकुमार पवार ,विलास भोंडवे उपस्थित होते. यावेळी आपली प्रतिक्रिया देताना कांताभाऊ राठोड म्हणाले की, दरवर्षी झेप फाउंडेशनच्या वतीने असे सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोविड कोरोनामुळे आषाढी वारी बंद असल्याने वारक-यापर्येंत जाता आले नाही.म्हणुन यावेळी हा उपक्रम हाती घेतला असल्याचे दैनिक चालु वार्ता शी बोलताना सांगितले.