
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी: अनंता टोपले
मोखाडा – तहसील कार्यालय, पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तहसील कार्यालय येथे दिनांक 21 जून वार मंगळवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.रक्तदान शिबिराचे उद्घाटन मोखाडा तहसीलदार महेश खेंगले व मोखाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणे यांच्या हस्ते करण्यात आले.तहसीलदार महेश खेंगले यांनी यावेळी रक्तदान केले आहे. यावेळी गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले,नायब तहसीलदार ठाकरे,डॉ चत्तर,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिंदे व तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.रक्तदान शिबिरात 32 रक्तदात्यांनी रक्तदान करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले आहे.शिक्षक तथा सुत्रसंचालक नितीन वामन आहेर व शिक्षक संतोष चव्हाण यांनी देखील रक्तदान केले आहे. यामध्ये तहसिल कार्यालय,पंचायत समिती, शिक्षण विभाग,आरोग्य विभाग व ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला.या सामाजिक उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
रक्त संकलनाचे जबाबदारी कुटीर रुग्णालय रक्त केंद्र जव्हार यांच्या टीमने केले असून यामध्ये डॉक्टर सचिन महाले वैद्यकीय अधिकारी,रक्त केंद्र वैज्ञानिक अधिकारी श्रीराम धुरी, अधिपरीचारिका दत्तात्रय ढाकणे, वाहन चालक वसीम शेख,परिचर विश्राम वाढू यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे