
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:तालुक्यातील संजय गांधी निराधार,श्रावण बाळ आणी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृती योजनेतील लाभार्थांना शासनाकडून मिळत असलेले अनुदान/मानधन पुढेही नियमितपणे चालु ठेवण्यासाठी शासन निर्णया प्रमाणे जून २०२२ पर्यत वार्षिक उत्पन्न २१००० हजार असलेले प्रमाणपत्र/दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र दाखल करण्यास सांगण्यात आले होते.अशा वेळी तालुक्यातील वयोवृध्द लाभार्थांची एकच धावपळ सुरू झाली यात तलाठी मिळता ग्रामसेवक मिळेना ग्रामसेवक मिळता तलाठी मिळेना जर मिळालेच तर कामाची हमी नाही अशा परिस्थितीत लाभ धारक वैतागून गेले होते.
सध्या पावसाळी हंगाम सुरू झालेला असल्यामुळे जास्तीचा पाऊस पडत आहे.यात वयोवृध्द लाभार्थाना सदर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अडचणी येत असल्याचे लक्षात घेता यापुढे लाभधारकांनी केवळ प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून त्यांचे मिळणारे मानधन बंद करण्यात येणार नाही परंतु शक्यतो लवकरात लवकर उत्पनाचे/दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र सादर करण्यात यावे असे तहसिलदार बिलोली यांच्या मार्फत कळविण्यात आले असून या निर्णयाने निराधार लाभार्थांची धाकधूक कमी होऊन जरासा दिलासा मिळाला आहे.