
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षा : मागील काही वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर होत आहेत. वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना एनईईटी (नीट) ही परीक्षा द्यावी लागते. या परिक्षेसाठी देशभरातून तब्बल सोळा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसतात. महाराष्ट्रातून सर्वाधिक साडेतीन लाख विद्यार्थी एनईईटी (नीट) परीक्षा देतात.
यंदाच्या परीक्षेसाठी देशभरातील वैद्यकीय पदवी
अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी होणारी नीट प्रवेश परीक्षा (निट २०२२) यंदा राष्ट्रीय पातळीवर ता. १७ जुलै रोजी होणार असून, त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एमबीबीएस, बीडीएस, बीएएसएम, बीएमएमएस अशा वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश हे नीट प्रवेश परीक्षेद्वारे होतात. यंदाची नीट प्रवेश परीक्षा यंदा ता. १७ जुलै रोजी दुपारी दोन वाजता ५४३ शहरांमध्ये घेण्यात येप ही परीक्षा इंग्रजी, मराठीसह एकूण १३ भाषांमध्ये घेण्यात येणार
आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेतून परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या परीक्षेत एमसीक्यू पद्धतीने एकूण २०० प्रश्न विचारण्यात येणार असून, परीक्षेसाठी एकूण तीन तास २० मिनिटांचा कालावधी दिला
नीट परिक्षेच्या तयारीसाठी देशभरातील विद्यार्थी आता नांदेड व लातूरसाठी पसंती देत असून येथून निकालाचा विक्रम वर्षानुवर्षे होत आला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी ●राजस्थानातील कोटा येथे जाऊन शिकवणीसाठी लाखो रुपये खर्च करायचे. आता मात्र नीटच्या परिपूर्ण तयारीसाठी नांदेड आणि लातूर सर्वोत्तम असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. नांदेड व लातूर येथून सर्वाधिक विद्यार्थी एमबीबीएसला पात्र ठरत असून यावर्षी २५ विद्यार्थ्यांना देशातील अग्रगण्य अशा नामांकित एआयआयएमएस महाविद्यालयात प्रवेश मिळवला आहे. ७२० पैकी ७१० गुण घेत अनिरुद्ध डाखरे, ६९६ गुण मिळवत श्रेया अरु यांनी दिल्ली येथे प्रवेश मिळवला आहे. विद्यार्थ्यांना फ्लॅट, हॉस्टेल मिळणे अवघड झाले असून आजूबाजूचे विद्यार्थ्यांना सहकार्य करत आहेत.
रहिवासी स्वतःचे राहते घर हॉस्टेल म्हणपरतमुलांच्या बुद्धिमत्तेनुसार बेसिकपासून शिकवून अति उच्च दर्जाचा शैक्षणिक दर्जा दिला जातो. विशेष म्हणजे कुठेही व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला जात नाही. आतापर्यंत आलेला निकालाचा वाढता आलेख पाहता पालक व विद्यार्थ्यांची नीट सारख्या महत्वाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी नांदेड व लातूरकडे पाहिले जाते.