
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:- तालुक्यातील आष्टा येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आष्टा-इयत्ता पहिली ते सातवी आणि विद्यामंदिर हायस्कूल आष्टा-इयत्ता आठवी ते दहावी च्या सर्व विद्यार्थ्यांना रजिस्टर , वह्या यांचे वाटप वै.ह.भ.प.आप्पासाहेब रामचंद्र सूर्यवंशी यांचे स्मरणार्थ समस्त सूर्यवंशी परिवार यांच्या वतीने श्री.आनंदराव आप्पासाहेब सूर्यवंशी यांच्याकडून करण्यात आले,तसेच इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना कंपासचे वाटप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री. सुशेन साहेबराव जाधव आणि युवाउद्योजक श्री अमोल चंद्रकांत काकडे यांचेकडून करण्यात आले.या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे सर्व पालक आणि गावकरी मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.अशोक पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य श्री.तात्यासाहेब आष्टेकर तसेच आष्टा गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री.चंद्रकांत काकडे,श्री संजीवन सूर्यवंशी हे होते तसेच जि.प.शाळेच्या वतीने दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता *कु.अंकिता अंगद नलवडे हिने इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये 99% गुण घेऊन जिल्ह्यामध्ये प्रथम* येण्याचा मान मिळवला,तसेच कु.राजश्री रमेश गावडे शाळेमध्ये प्रथम क्रमांक,कु.वैष्णवी विलास गिलबिले द्वितीय क्रमांक,चि.आदित्य राजेंद्र गिलबिले तृतीय क्रमांक या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या पालकासह करण्यात आले आणि सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत असताना ग्रामपंचायतचे सदस्य श्री तात्यासाहेब अष्टेकर व ग्रामसेवक एस.बी.केंद्रे यांनी लवकरच जि.प.प्रा.शाळा.आष्टा जि.प.प्रा.शाळा.आष्टावाडी व विद्यामंदिर हायस्कूल आष्टा.येथे ग्रामपंचायत मार्फत शुद्ध पिण्याचे पाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे म्हणून पाण्याचे RO- सह फ्रिजर फिल्टर बसवण्यात येतील असे सांगण्यात आले.याप्रसंगी गावातील श्री.गणेश गिलबिले,विक्रम शेळके,अमोल शेळके,विलास गिलबिले,कुबेर नलवडे,विठ्ठल नलवडे,किरण गिलबिले,अजित पाटील,माऊली गिलबिले,बळीराम घाडगे,चंद्रशेखर पाटील,मा.सरपंच शिवाजी माळी,रवींद्र दोरगे, रावसाहेब माळी, तुकाराम कवडे, सर्व ग्रा.पं.सदस्य ग्रामसेवक एस.बी.केंद्रे दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक श्री.तांबे सर व श्री.रणदिवे सर, केंद्रप्रमुख श्री.उगलमुगले सर व सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.