
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृति शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी) पुणे आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद यांचे संयुक्त विद्यमाने मराठा, कुणबी, कुणबी- मराठा, मराठा- कुणबी या लक्षित गटातील युवक – युवतींसाठी कौशल्य विकास जनजागृती मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात 26 जून रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे.
या मेळाव्यात मराठा, कुणबी, कुणबी- मराठा, मराठा- कुणबी या लक्षित गटातील युवक –युवतींची कौशल्य विषयक अभ्यासक्रमासाठी नाव नोंदणी, समुपदेशन आणि प्रशिक्षणानंतर रोजगार व स्वयंरोजगाराकरिता उपलब्ध असलेल्या संधीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कौशल्य विकास जनजागृती मेळाव्याचा लक्षित गटातील जास्तीत जास्त युवक युवतींनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.