
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
भिवधानोरा (ता.गंगापूर) येथील धोकादायक अवस्थेत असलेल्या विजवाहिन्या हया लोंबकळत होत्या. अनेक वेळा ग्रामस्थांनकडून देखील तक्रारी करण्यात आल्या तसेच ग्रामपंचायतकडून देखील अधिकारी वर्गांना निवेदन देण्यात आले होते परंतु संबंधित महावितरण कंपनीकडून कामाविषयी चाल ढकल पना होत असल्याने ग्रामस्थांन मधून रोष निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. उद्भवलेल्या या परिस्थितीची दखल घेत तसेच महावितरणच्या या भोंगळ कारभाराविषयी दैनिक चालू वार्ता ने अखेर दि.18 जून रोजी वृत्त प्रकाशित करताच अधिकारी तसेच कर्मचारी हे खडबडून जागी झाले व दि 20 जून रोजी प्रत्यक्षात लोम्बकळलेल्या विजवाहिन्यांच्या कामास सुरवात झाली.या मध्ये एक धोकादायक असलेले रोहित्र देखील स्थलांतरित करण्यात आले. रखडलेल्या या कामास सुरुवात झाल्यामुळे ग्रामस्थांमधून देखील समाधान व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया 1
महावितरण कार्यालयातील काही अधिकारी सहकार्य करत होते पण काही ठिकाणी थोडी चालढकल पना हा सुरू होता. त्याच वेळी दैनिक चालू वार्ता ने आपल्या दैनिकामध्ये वृत्त प्रकाशित करून ग्रामपंचायतच्या वतीने आतापर्यंत काय पाठपुरावा केला याची माहिती घेऊन बातमी प्रकाशित केली व या कामाला गती मिळाली व आता प्रत्येक्षात काम पूर्ण होत असून त्या बद्दल दैनिक चालू वार्ताचे व सर्व टीम तसेच प्रतिनिधींचे खूप खूप धन्यवाद
बाबासाहेब चव्हाण
उपसरपंच भिवधानोरा
प्रतिक्रिया 2
रखडलेल्या या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली त्यामुळे ग्रामस्थांनी एका प्रकारचा सुटकेचा निश्वास सोडला आहे.कारण अनेक वेळा दोन तारांमध्ये स्पार्किंग होऊन आगीचे लोळ खाली पडत होते.त्या मुळे खाली खेळत असलेल्या लहान मुलांच्या ही जीवितास धोका होता.कामास सुरुवात झाल्यामुळे दैनिक चालू वार्ता चे खूप खूप धन्यवाद
बबन चव्हाण
माजी ग्रामपंचायत सदस्य भिवधानोरा