
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा : – धानोरा मक्ता येथिल गयाबाई बालाजी कदम वय ६५ हि महिला आचानक पाय घसरुन पडल्याने त्यांना आधार ओर्थोपेडीक अण्ड मल्टीस्पेसीलीटी हॉस्पिटल लोहा दाखल करण्यात आले असता कंबरेचे हाड फाॅक्चर झाले आहे असे डॉक्टरांनी सांगितले असता त्यांची शस्त्रक्रिया हि मुंबई पुणे शिवाय होत नव्हती. व त्या पेशंटला अर्जेट व्हिप जोईट रिप्लेसमेंट ची गरज होती. हि सर्जरी अवघड होती तरी पण लोहयाचे भुमीपुत्र श्री डाॅ अभिजीत शिंदे MBBS DNB Ortho यांनी लोहयातच त्यांच्या नवीन आधार हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पाडली. या कार्याचे कौतुक करत डॉ अभिजीत शिंदे यांच्या त्या पेशेंटच्या
कुटुंबाती व नातेवाईकांनी सर्व टिमचा सत्कार केला
यावेळी मनोहर कदम ,तिरुपति कदम ,बालु संगेवार, राजू पा चव्हाण ,आनंद धनसडे ,सुभाष बनसोडे ,लक्ष्मी क्लाथचे मालक निलेश सुञावे आदिंनी आभार मानले. यावेळी या पेशंट व नातेवाईकांनी यापुढे अशा पेशंटना पुणे मुंबई जाण्यासाठी गरज नसल्याचे सांगितले. हि सर्जरी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार केल्याने आधार हाॅस्पीटलचे डॉक्टर व टिमचे आदिंनी आभार मानले.