
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
वारकरी बांधवांना खाद्यपदार्थ, चादरी आदींचे वाटप
जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे बुधवारी पुण्यात आगमन झाले. यावेळी भारतीय जनता पक्षाकडून दोन्ही पालखींचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुष्पवृष्टी करुन, वारकऱ्यांना अभिवादन केले. तसेच, वारकरी बांधवांना खाद्यपदार्थ आणि चादरींचे वाटप देखील यावेळी केले.
कोरोनाच्य संकटानंतर यंदा पहिल्यांदाच पायी वारी निघत असल्याने, वारकरी आणि विठ्ठल भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण होते. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे २० जून रोजी श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान झाले. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे २१ जून रोजी श्री क्षेत्र आळंदी येथून प्रस्थान झाले.
बुधवारी दोन्ही पालख्यांचे पुणे शहरात आगमन झाले. यावेळी भारतीय जनता पक्षाकडून दोन्ही पालख्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील हेदेखील यावेळी विठूरायाच्या गजरात दंग झाल्याचे पाहायला मिळाले.
आ. पाटील यांनी वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करुन अभिवादन केले. तसेच, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन दोन्ही पालख्यांचे सारथ्य केले. यावेळी वारकरी बांधवांना खाद्य पदार्थ आणि थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी चादरींचे वाटपही आ. पाटील यांच्यवतीने करण्यात आले.