
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- किशोर वाकोडे
जळगाव जा :- दि.२३. गरीब,गरजू शेतकऱ्यांना मोला माहगाईचे बी-बियाणे-खते घेणे परवडत नसल्याने शासन स्तरावर महाडीबीटी या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले अशा शेतकऱ्यांना काही टक्के अनुदानावर सरकार शेतकऱ्यांना सोयाबीन,उडीद,मूग इतर बियाणे व खते उपलब्ध करून देतात.
हे बी-बियाणे मिळावे यासाठी २०२२ या वर्षाला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी महा डीबीटी अंतर्गत ऑनलाइन अर्ज केले होते.परंतु पेरणीचे दिवस आले असतांना सुद्धा कृषी विभागाकडून मात्र बि-बियांनाचा कोठा हा तालुक्याला कमी असल्याचे सांगत काहीच शेतकऱ्यांनाच सोयाबीन व इतर बि देत अल्याचे दिसून येते. तर अनेक शेतकऱ्यांना महाडीबीटी पासपोर्ट अंतर्गत पाठवण्यात आलेले मेसेज असून सुद्धा कोणत्याच प्रकारचे सोयाबीन व बियाणे कोठा उपलब्ध नसल्याचे कारण दाखवत बियाणे देत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.त्यामुळे ज्या गरीब शेतकर्यांनी ऑनलाइन अनुदान स्वरूपात बी-बियाणे व खतांची मागणी केली आहे. अशा शेतकऱ्यांना मोला महागाईचे बियाणे कृषी सेवा केंद्र वरून नाईलाजास्तव विकत घ्यावे लागतात.ह्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मागणीला कृषी विभाग विचारात घेईल का? हा सुद्धा प्रश्न अनेक शेतकरी बांधवांना पडलेला आहे. बियाणे महामंडळनी/कृषी विभागाने शेतकऱ्यांना बियाणे-खते देण्यासाठी कोठा उपलब्ध नाही. सांगत असल्याने शेतकरी वर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरी जळगाव जामोद तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी महा डीबीटी अंतर्गत ऑनलाइन बी बियाणे करता अर्ज केलेले आहेत शेतकऱ्यांना बी-बियाणे-खाते उपलब्ध करावे याकरता शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय गाठत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.यावेळी युवा आंदोलक अक्षयभाऊ पाटील, दिपक म्हसाळ, अजय गिरी, तुकाराम पाटील, अश्पाक देशमुख, पवनसिंग सोमवंशी, अवी पाटील मोहन वंडाळे तसेच बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.