
दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा: दि .२३. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये बुलडाणा जिल्ह्याची ( घाटाखाली ) वंचित बहुजन युवा आघाडीची कार्यकारिणी निलेश विश्वकर्मा प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी यांनी जाहीर केली .यामध्ये जिल्हा अध्यक्षपदी अनिल वाकोडे तर महासचिव म्हणून सचिन राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बांधणी तसेच पक्षवाढीच्या उद्देशाने ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे .उर्वरित कार्यकारिणीत राहूल शिरसोले-संघटक, मो.जामोशोद्दीन-कोषाध्यक्ष, संजय बोदडे -प्रसिद्धी प्रमुख, अनिल राठीत ,नागसेन खंडेराव,सुपडा बांगर-उपाध्यक्ष, रवी पहुरकर-सचिव, संजय वानखडे-सोशल मिडीया प्रमुख, तर पावन तेलंग व नितीन सुर्यवंशी – सदस्य यांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष गणेश चौकसे, महिला जिल्हा अध्यक्ष विशाखा सावंग ,जिल्हा महासचिव आतीष खराटे व जिल्हा संघटक भाऊराव उमाळे यांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.
येवू घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकी आधी ही कार्यकारिणी जाहिर झाल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .बुलडाणा जिल्ह्यात होऊ घातलेल्या निवडणूकीत चांगले यश संपादन करेल असा दृढ विश्वास नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष अनिल वाकोडे ह्यांनी भ्रमणध्वनीवरून व्यक्त केला.