
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई-शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे.
शिवसेनेच्या ४२ आमदारांनी बंड केल्याचे समोर आले आहे. या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच ढवळून निघाले. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
या परिस्थितीवर मात करुन महाविकास आघाडीचे सरकार बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. अडीच वर्षे महाविकास आघाडीने चांगले काम केले. कोरोना काळात चांगले काम केले. प्रसिद्धी माध्यमातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. ज्या पद्धतीने शिवसेनेच्या आमदारांना घेऊन गेले आहेत त्याची वस्तुस्थिती लोकांना सांगतिली आहे, आणि अजूनही त्यातील आमदार शिवसेनेसोबत आहोत हे स्पष्ट करतील, असं शरद पवार म्हणाले.
या परिस्थितीवर मात करुन महाविकास आघाडीचे सरकार बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. या अडीच वर्षात महाविकास आघाडीने चांगले काम केले आहे. चांगले निर्णय घेतले आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग फसलेला नाही. गुवाहाटीला गेलेले आमदार परत आले की स्पष्ट होईल बहुमत कोणाच्या बाजूने आहे, पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार आहे हे देशाला दिसेल, असंही शरद पवार म्हणाले.