
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
भोपाळवाडी:- बळीराम पाटील प्राथमिक शाळा, भोपाळवाडी केंद्र-सा.का.गांधीनगर या शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त घड्याळी 1तास योग शिबिर घेण्यात आले.या मध्ये शाळेचे मुख्याध्यापक माधव भोपाळे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व विशद करून मानवी जीवनात योगाचे महत्त्व सांगितले.तसेच चिमुकल्या लेकरांसमोर योगासननाचे प्रात्यक्षिके करून दाखवत त्यांच्याकडून योगासने करून घेतले.या कार्यक्रमात शाळेच्या जेष्ठ शिक्षिका राजश्रीताई कंधारे व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्यक्षिके सादर केली.