
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी अरुण भोई
नागरिकांचा रस्ता रोखोचा ईशारा
नायगाव ता.दौंड येथील उजनी व वन संपादित क्षेत्रातून माती चोरी गेली अनेक दिवसांपासून होत आहे ती बंद करण्यात यावी यासाठी लेखी निवेदन तहसिलदार , वनविभाग व उजनी यांना मुकेश गुणवरे,मनोज भोसले,भारत खराडे,अमोल मोरे,दत्ताजी मोघे,महादेव बागडे,नवनाथ लोंढे,शहाजी गुणवरे,सचिन खैरे यांनी लेखी निवेदन देऊन भिगवन -दौंड रस्ता रोखो करण्याचा इशारा दिला आहे.
भीमा नदीच्या पायथ्याला असलेल्या क्षेत्रातून मातीची चोरी अहोरात्र केली जात आहे. मात्र प्रशासन याकडे साफ डोळेझाक करीत आहे. भीमा नदीची पाणी पातळी जशी घटली आहे तशी या भागातून मातीची चोरी मोठ्या प्रमाणावर केली जाऊ लागली आहे.समंधीट क्षेत्र उजनी व वन संपादित असल्याने या क्षेत्रात भीमा सिंचन शाखेच्या अंतर्गत व वन विभाग अंतर्गत येत आहे मात्र येथील कर्मचारी या क्षेत्राची कसलीच देखभाल करत नाहीत.येथील उत्खनन केलेल्या क्षेत्राचे पंचनामे करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नायगाव येथील भीमा नदीवरील क्षेत्रात नजीक
उजनी व वन संपादित क्षेत्र असल्याने अहोत्र वीटभट्टी व शेती भरण्यासाठी मातीची चोरी केली जात आहे मात्र प्रशासनाला यांची नागरिकांनी वारंवार जाणीव करून देखील प्रशानाकडून येथील मातीची चोरी थांबण्यात आली नाही .या भागाला उजनी व वन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर लाभले आहे हे क्षेत्र भीमा नदीच्या तीरांपर्यात असल्याने हे माती तस्कर नदीच्या तीरावर माती उपसा करत आहे या लेखी निवेदनाची प्रत महसूल, वनविभाग व उजनी यांना देण्यात आले आहे आणि माती चोरी बंद करण्याची मागणी केली आहे