दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
किल्ले धारूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धारुर तहसील कार्यालया अंतर्गत तालुक्यातील दिव्यांगाची अंत्योदय योजनेत निवड करून दिव्यांगांना पिवळ्या शिधा पत्रिकांचे आ. प्रकाश सोळंके यांच्या नुसार माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. आ. प्रकाश सोळंकेयांच्या प्रयत्नांतून तालुक्यातील ४७ दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभमिळाला. या लाभार्थ्यांना दक्षता समितीचे अध्यक्ष सय्यद शाकेरअली यांनी तहसील कार्यालयात प्रयत्न करून पिवळ्या शिधा पत्रिका उपलब्ध करून दिल्या. यामुळे दिव्यांग संघटनेच्या सदस्यांनी आभार व्यक्त केले. राष्ट्रवादीचेनेते माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ यांच्या हस्ते व दक्षता समितीचे अध्यक्ष सम्बद शाकेरअली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितिन शिनगारे, समिती सदस्य अनिल महाजन यांच्या उपस्थितीत दिव्यांगाना शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. यावेळी दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब झिंगुर्डे, भगवान तट, ज्ञानदिप शिनगारे, गफार खान, निसार तांबोळी, महादेव शिर्के, नितीन गोंदणे, संतोष गोंदणे, यांच्यासह लाभार्थी आणि दिव्यांग कार्यकर्ते उपस्थित होते