
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- शहरातील रवींद्र हायस्कूलच्या बाजूला बौद्ध समाजाची पिढ्या नं पिढ्या चालत असलेली स्म्शानभूमी आहे. या स्म्शानभूमीची नोंद अजूनही शासन दरबारी झालेली नाही. त्यामुळे इथे कोणतीही सुविधा अस्तित्वात नाही. दहन शेड नसल्याने अजूनही अंत्यविधी उघड्यावरच करावा लागतो. त्यात या समाजाची जास्त तारांबळ पावसाळ्यात होते कारण पावसामुळे बऱ्याच दा प्रेत पूर्णपणे दहन होत नाही मग अशा परिस्थितीत टेम्पर्री पत्र्याचे शेड मारून अंत्यविधी करावा लागतो. या संदर्भात ऑल इंडिया पँथर सेनेने वेळोवेळी उपोषण व निवेदने दिली आहेत पण अद्याप नगरपरिषद नोंद करायला तयार नव्हती. या जागेवर महाराष्ट्र शासनाचे आरक्षण आहे असे सांगितले जात होते पण मधल्या काळात ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड यांनी उपोषणाचा इशारा देताच प्रशासनाने याचा प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी उस्मानाबाद येथे पाठवला आहे. त्यातच नगरपरिषदेने याच स्म्शानभूमीतून एक नवीन रस्ता तयार करण्याचे काम सुरु केले होते त्यास पँथर सेनेने विरोध केला व 16 जून रोजी उपजिल्हाधिकारी यांना हा अनधिकृत रस्ता तात्काळ बंद करावा व या रस्त्यास परवानगी देणाऱ्या अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावे अशा मागणीचे निवेदन दिले अन्यथा 27 जून रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण करणार असा इशारा दिला. यावर नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेत सदरचा रस्त्याचे काम बंद करण्यात यावे तसेच कामावर टाकलेले मटेरिअल उचलून न्यावेत अशा आश्याचे लेखी पत्रच संबधित कॉन्टॅक्टर यांना दिले. सद्या बौद्ध समाजाच्या स्म्शानभूमीची भूमिअभिलेख विभागात 0 हेक्टर 46 आर अशी नोंद आहे. या रस्त्याचे काम बंद करण्यासाठी दिलेल्या निवेदनात ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड, तालुका अध्यक्ष महेंद्र गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, तालुका उपाध्यक्ष विकी जावळे, कदू जानराव, सायरनं गायकवाड, संतोष माने, विनोद वाघमारे, सोनम बनसोडे, राज गायकवाड, पंकज चौधरी, सुजित शिंदे, आदी पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.