
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
सराटी तालुका इंदापूर येथे कोरोना महामारीच्या संकटा नंतर दोन वर्षानी तुकाराम महाराजांची पालखी आषाढी वारी निमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेली आहे. मुक्काम दर मुक्काम करत पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी तालुका इंदापूर या ठिकाणी आहे. गावच्या वतीने प्रमुख,, पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,, राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष हानुमंत कोकाटे,, सराटीचे विद्यमान सरपंच बापूसाहेब कोकाटे. पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे,, पैलवान महेश जगदाळे, पैलवान आमर जगदाळे, बाबासाहेब कोकाटे,, आर.जे.ग्रुपचे सर्व कार्यकर्ते , पैलवान रोहीत जगदाळे, वकील राजू जगदाळे, युवा नेता भैया कोकाटे, तसेच ग्रामपंचायत सराटी आणि ग्रामस्थ, यांच्या सहकार्याने तुकाराम महाराज पालखी तळ या ठिकाणची सर्व स्वच्छता चकाचक तयारी केलेली आहे. भाविक भक्त व वारकरी व दिंडी मालक यांना राहण्यासाठी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. स्वच्छ पाणी पिण्यासाठी पाण्याची सोय. गावा शेजारील सर्व भागाची स्वच्छता करण्यात आली. भाविकांसाठी अंतर्गत व सार्वजनिक शौचालय, सर्व भाविकांसाठी अन्नदान सेवा ही सालाबाद प्रमाणे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आसते व आलेल्या सर्व वारकरी भाविक भक्त व तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्या बरोबर बंदोबस्तासाठी आलेले प्रशासन,, पोलीस अधीक्षक, प्रांत, तहसीलदार व प्रशासकीय अधिकारी या सर्वांसाठी सर्व सुविधा सराटी ग्राम पंचायतीच्या व गावातील ग्रामस्थांच्या वतीने उपलब्ध केलेल्या आहेत. दिंडी सोहळ्या बरोबर येणाऱ्या भाविक भक्तांसाठी कोणत्याही आडचणी येऊ देणार नाही. सराटी येथील ग्रामस्थांच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. दोन वर्षानंतर पहिल्यांदाच पालखी सोहळा आल्यामुळे भाविक भक्त आनंद व्यक्त करीत आहेत व जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सराटी ग्रामस्थांच्या वतीने स्वागतही करण्यात येणार आहे.