
दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृह तात्काळ सुरू करा, अशी मागणी एसएफआयच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. शासनाच्या वतीने उसतोड कामगारांच्या पाल्यांचे परजिल्ह्यात, परराज्यात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत हंगामी वस्तीगृहे चालविले जातात. परंतु यावर्षी उसतोड कामगार कारखान्याला अद्यापपर्यंत ५० टक्के गेलेला आहे. त्यांच्या पाल्यांच्या जेवनाची सोय घरी होत नसल्याने सोबत घेवुन जात आहेत. यामुळे उसतोड कामगारांच्या पाल्यांना जास्तीत जास्त शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने त्वरीत वस्तीगृहे सुरू करावी. जेणेकरून विद्यार्थ्याना पालक कारखान्याला घेवून जाणार नाहीत. यामुळे शासनाने वस्तीगृहे लवकरात लवकर सुरू करावीत. नसता डीवायएफआय युवा संघटना व उसतोड कामगार संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.