
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मा. पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा निमित्त सहपत्नीक जोड आहेर देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन संस्थेचे सचिव व शेकापूर नगरीचे मा.सरपंच शिवाजीराव पा.केंद्रे आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मा.जिल्हा परीषद सदस्य नांदेड मा.संभाजीराव पा. केंद्रे आणि श्री.संत गाडगेबाबा संस्थेचे अध्यक्ष दौलतराव केंद्रे , मा.संजयजी येरमे साहेब बि.ओ.शिक्षण विभाग कंधार , मा .पांडे साहेब शिक्षण विस्तार आधिकारी कंधार , ह.भ.प.शास्ञी महाराज नारायण केंद्रे , चेअरमन भाऊराव पा.केंद्रे , प्राचार्य मोतिभाऊ केंद्रे , पर्यवेक्षक रामराव वरपडे यांच्या हास्ते मा.पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे यांचा सहपत्नीक जोड आहेर देऊन सत्कार करण्यात आला.
या समयी सर्वांचे लाडके प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे म्हणाले की ,वसंतरावानीं सेवा नेहमी कार्य तत्पर राहून शाळेची सेवा निस्वार्थ पणे केली आणि नेहमी अध्यापन मनोरंजक पध्दतीने कले असे विचार त्यांनी व्यक्त केले
पुढे बोलताना मा.श्री.येरमे साहेब म्हणाले की वसंतराव केंद्रे यांचे कार्य चांगले आहे .व मनलावून काम केल्यावर चांगलेच नाव निघत आसते .आता पुढील आयुष्य धार्मिक स्थळे फिरावे घरच्यासाठी द्यावे .योगा व प्रणायाम करून तंददुरूस्त राहावे.व त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नंतर दौलतराव केंद्रे साहेब म्हणाले कि वसंतराव केंद्रे यांचा स्वभाव चांगला आहे शांत स्वभाव , होतकरू व्यक्तीमत्व ,चिकाटी ,आभ्यासु वृत्ती चे आहेत असे म्हणुन शुभेच्छा दिल्या.
व पुढे बोलताना संभाजीराव पा. केंद्रे साहेब म्हणाले की नियमित वयोमाना नुसार सेवानिवृत होत आहे; पर्यवेक्षक म्हणुन चांगले काम केले त्यांनी बतीस वर्षे सेवा केली तसेच त्यांच्या पत्नी राऊबाई केंद्रे त्यांच्या कामा बदद्ल कौतुक करून शाब्बासकी दिली कारण वसंतराव केंद्रे यांना शाळेत तत्पर राहण्यासाठी मौलाचे सहकार्य केले म्हणून राहीलेले आयुष्य आता घरच्या कामात घालावे योगा करून शरीर प्रकृती निरोगी राहावी असेही ते म्हणाले आणि कौतुक करून पुढील जिवनास शुभेच्छा दिल्या .
यावेळी तालुका मा.समादेशक शिवाजीराव मुंडे ,डाँ.दत्ता केंद्रे ,मा.प्रा.शंकरराव पांचाळ , प्रा.विनायक मोरे ,प्रा.मुंजाजी शिंदे ,मा.पर्यवेक्षक पवनराव कंधारे ,केशव केंद्रे सर , संस्कृतीक विभाग प्रमुख व्यंकटराव पुरमवार ,प्रा.अरूण केदार ,प्रा.सुर्यकांत गुट्टे , प्रा.भारतलाल सुर्यवंशी , मोहीत केंद्रे सर ,सुर्यकांत श्रीमंगले सर ,आमित लोंड सर ,चंद्रकांत पडलवार सर ,प्रा.देविदास जायभाये , प्रा.गोविंदराव आडे ,प्रा.सौ.स्वाती रत्नगोले मँडम , प्रा.गिरीश नागरगोजे , प्रा.विजय राठोड ,प्रा.पंकज पाटील , शिवाजीराव मेंडके सर ,शेख एम.एम. , किशन ठोंबरे सर ,आनिल बोईवार सर ,महेद्र बोराळे सर ,प्रा.हाणमंत भालेराव , पञकार एस.पी.केंद्रे , बालाजी केंद्रे , संभु वाघमारे , मुकेश केंद्रे , आदिसह उपस्थीत होते.