
दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी-पंकज रामटेके
महिला व पुरुष, जि.प सदस्य, पं.स सदस्य, ग्रा.प सरपंच, उपसरपंच, सदस्याची विज कार्यालयाला धडक
दि. २४ जून चंद्रपूर तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील नकोडा, घुग्घुस, उसगाव, शेणगाव, सोनेगाव, धानोरा तसेच आजूबाजूच्या गावात मागील ३ महिने पासून वीज खंडित होण्याचे प्रकरण वाढत चालले आहे. अति उष्ण असलेल्या चंद्रपूर जिल्हातील नागरिकांना उन्हाळ्यात उच्च तापमानात देखील वीज वारंवार खंडित होत असल्याच्या त्रास भोगावा लागला आहे. विजेच्या उपकरणात योग्य तो बदल अथवा दुरुस्ती करून वीज पुरवढा सुरळीत करण्यात यावा, याकरिता अनेको पत्र व्यवहार करून सुद्धा स्थानिक वीज कार्यालयाचे अधिकारी, अभियंता व इतर कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे येथील स्थानिक नागरिका संतापले आहे.
अनेको पत्र व्यवहार करून सुद्धा विज पुरवढा कार्यालय लक्षपूर्वक कार्य करीत नाही, त्यामुळे नागरिकामध्ये तीव्र आक्रोश निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. आज नकोडा गावातील पुरुष महीला यांनी ब्रिजभूषण पाझारे, बाळकृष्ण झाडे यांचा नेतृत्वात व माजी अर्थ व नियोजन मंत्री सुधीरभाऊ मूनगंटीवार, भाजपा जिल्हा अध्यक्ष देवरावजी भोंगळे व भाजपा महानगर अध्यक्ष डॉ.गुलवाडे यांचा मार्गदर्शनाखाली घुग्घुस उप विज पुरवढा कार्यालयात भेट देऊन निवेदन दिले. निवेदनानुसार वीज पुरवढा वारंवार खंडित केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे. यावेळी उपस्थित नकोडा ग्रामपंचायत सरपंच किरण बांदुरकर, उपसरपंच मंगेश राजगडकर, सोनेगाव ग्रा.प सरपंच संजय उकीनकर, धानोरा ग्रा.प सरपंच विजय आगरे, ग्रा.प सदस्य रजत तुरणकर, कम्पा राजय्या, भाजपा महील आघाडी सदस्य सुचिता बोबडे, पंढरी कोवे सुचिता बोबडे ममता मोगरे सविता भांदककर संध्या उमेर संगीता निखाडे रंजीता तेलंग सरिता डंभारे सारीका चोपने, आकाश काळे, प्रकाश काळे महेश राजगडकर वैभव निखाडे स्वप्नील हनुमंते कबीर शेख अंकीत कुमार जुनेद सय्यद अनिकेत गेडाम व नागरिकाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.