
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी कविमम सरकार इंगळी
इयत्ता ५वीच्या बालभारती पाठ्य पुस्तकात समाविष्ट असलेल्या !! कठीण समय येता!! या कथेचे लेखक मनोहर भोसले सैनिक टाकळी. ता.शिरोळ जि.कोल्हापूर
यांच्या मनूदाच्या कथा या प्रसिध्द कथासंग्रहाचा समावेश शासनमान्य ग्रंथसुचीत यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
याबाबतची अधिसूचना शासनाने ०६ जून २०२२ रोजी काढली आहे. मनोहर भोसलेयांच्या पुस्तकांना आजवर महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्रा बाहेरील अनेक कवी,लेखक, समीक्षक, रसिक, वाचक,अभ्यासक, इत्यादींची भरभरून दाद आणि कौतुक मिळाले आहे.
त्याना आजवर महाराष्ट्रातील विविध संस्थांकडून अनेक पुरस्कार मिळाले आहेत.