
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : राज्यसभेच्या वेळी आमदारांच्यामध्ये शंका उपस्थित केली. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीच्यावेळी त्यांना विश्वास दाखवला, मुंबईतून गुजरातकडे पळवलं. गुजरात भाजप नेत्यांना असुरक्षित वाटत असल्याने त्यांनी गुवाहाटीला सगळ्यांना हालवलं. तिथं भाजपचं सरकार असल्याने तिथं पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रोज आमदार तिथल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दाखल होत आहेत. पण तिथं भाजपाने टाकलेल्या जाळ्यात एकनाथ शिंदे फसले आहेत. तिथं असलेल्या कडीकुलपातून त्यांना बाहेर शक्य नसल्याचं दिसत आहे.