
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई – कोरोना बाधित झालेल्या राज्यपालांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी आहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. राज्यपालांना डिस्चार्ज मिळाल्यास राजकीय सत्तांतर नाट्याला वेग येणार आहे. सध्या राज्यात राजकीय उलथापालथ पहायला मिळत आहे.
दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.. त्यांना मुंबईतील रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.