
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- भरत पवार
उद्या सकाळी आमदार संतोष बांगर साहेब हे कळमनुरी, बाळापुर, वारंगा, डोंगरकडा येथील शिवसैनिकांशी साधणार प्रत्यक्ष संवाद….!!!
सध्या राज्यात संधिसाधू, सत्तापिपासू लोकांमुळे शिवसेना पक्ष अडचणीत आलेला असताना हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब हे माननीय शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आजच मुंबईवरून मतदारसंघात परतले असता शिवसैनिकांशी संवाद साधत असताना आमदार बांगर यांना अश्रू अनावर झाले होते त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांना, आमदारांना भावनिक आवाहन करत मातोश्रीवर परत येण्याची जाहीर विनंती देखील केली. सर्व राज्यात संभ्रमाचे वातावरण असताना आमदार संतोष बांगर साहेब यांच्या एकनिष्ठतेमुळे हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना अभेद्य आहे आमदार बांगर यांच्या एकनिष्ठतेचे कौतुक उभा महाराष्ट्र करतोय, दिनांक 25/ 6/ 2022 रोजी आमदार संतोष बांगर साहेब हे मतदार संघातील
कळमनुरी येथे सकाळी ०९:०० वाजता
सकाळी १०:०० वाजता आखाडा बाळापुर,
सकाळी १०:३० वाजता वारंगा,
११:०० डोंगरकडा येथे शिवसैनिकांशी प्रत्यक्ष भेटी घेऊन संवाद साधणार आहेत तसेच शिवसेनेवर आलेल्या संकट काळात हिंगोली जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांनी उद्धव साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन देखील करणार आहेत