
दैनिक चालु वार्ता भिगवण प्रतिनिधि :जुबेर शेख
भिगवण :भिगवन स्टेशन येथे चाललेल्या हानिकारक डस्ट वाहतूक बंद करणे संदर्भात भिगवण स्टेशन मधे ग्रामसभेची मागणी समस्त ग्रामस्थानकडून करण्यात आली होती त्यांच्या मागणी नुसार आज दि 24 जून 2022 भिगवण स्टेशन मधे सरपंच तानाजी वायसे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली.या ग्रामसभे मधे मोठ्या प्रमाणात ग्रामस्त उपस्थित होते यामधे महिलांची उपस्थित लक्षणीय होती.
भिगवण स्टेशन येथे मागील काही दिवसामधे हानिकारक डस्ट ची वाहतूक केली जात होती या डस्ट मुळे स्थानिक लोकांमधे मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता या डस्ट मुळे वयस्कर व लहान मुलांना आरोग्या विषयी विकार होण्याची शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे लोकांनी ग्रामसभेची मागणी केली व त्या नुसार वाहतूक बंद करण्याच्या बाजूने 144 लोकांनी व 14 लोकांनी विरुद्ध बाजूने हात ऊँचाउन मतदान केले त्या नुसार या डस्ट ची वाहतूक बहुमताने बंद करण्याचा निर्णय झाला.यांचे सूचक पराग रमेशराव जाधव व अनुमोदक संजय पंढरीनाथ देहाड़े हे आहेत.
स्थानिक हुंडेकरी यांच्या बद्दल देखील प्रचंड नाराजी
भिगवण रेल्वे स्टेशन मधुन खूप वर्षा पासून सीमेंट, शेतकी खते व साखर यांची वाहतूक रेल्वे च्या माध्यमातून केली जाते. ही वाहतूक करताना लाेकांची कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. ट्रक च्या पाठी मागून उड़णारी धूळ व होणारे प्रदुषण देखील हानिकारक आहे अशी लोकांमधे कुजबुज होती या प्रतिष्ठीत हुंडेकरी यांनी देखील ही वाहतूक करताना लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजेत अशी स्थानिक ग्रामस्थ मागणी करत होते.
या ग्रामसभेमधे सरपंच तानाजी वायसे,इंदापुर पंचायत समिति चे मा उपसभापती संजय देहाड़े, मा सरपंच पराग जाधव, ग्रामपंचायत सदस्य जयदीप जाधव ,कपिल भाकरे,तुषार क्षीरसागर, दत्ता धवडे, गुराप्पा पवार,आबासाहेब काळे, बाबासो शिंदे, आप्पा खड़के,जावेद शेख पंचशील सेवाभावी अध्यक्ष किरण कांबळे व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व महिलांची उपस्थित होती .